भीषण अपघात । डोंबिवलीत डम्परच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

0


डोंबिवली : पूर्वेतील डॉ राजेंद्र प्रसाद रोडवर शुक्रवारी संध्याकाळी डम्परने दिलेल्या धडकेत एका पदचाऱ्याचा मृत्यू झाला. सद्या सर्वत्र काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्ते कामांसाठी लागणारा माल घेऊन येणारे डंपर चालक शहरातून भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याच्या तक्रारी आहेत. अशाच एका डम्परचे चाक एका पादचाऱ्याचा डोकीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या पादचाऱ्याचा चेहरा विद्रुप झाला आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिथल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात त्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या पादचाऱ्याचा चेहरा विद्रुप झाला आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी एक पादचारी डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जात असताना रघुकुल सोसायटी जवळ एका अवजड मालवाहू डम्परने पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या धडकेत पादचारी डम्परच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पादचाऱ्यांनी ओरडा केल्यानंतर डम्पर चालकाने वेग कमी केला. साकेत इंफ्राप्रोजेक्ट नावाच्या बांधकाम कंपनीच्या मालकीचा डम्पर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.अपघात घडल्यावर रस्त्यावरुन जाणा-या अन्य पादचाऱ्यांनी आरडाओरडा केला असता डंपरचालक पसार झाला आहे. पोलिसांनी डंपर जप्त केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय कांबळे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)