तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा ; डोंबिवली टिळक नगर पोलिसांनी तरुणाला केली अटक

0


डोंबिवली : डोंबिवली जवळील पत्रीपूल भागातील काही तरुणांनी भर रस्त्यात तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार कल्याण पत्री पूल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. तलवारीने केक कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच डोंबिवली टिळक नगर पोलिसांनी इरफान जमादार या तरुणावर कारवाई केली आहे.

कल्याण पत्री पूल परिसरात राहणाऱ्या इरफान जमादार याचा रविवारी वाढदिवस होता. या निमित्ताने रात्रीच्या सुमारास इरफानच्या मित्रांनी भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन केलं. यावेळी इरफानने तलवारीने केक कापला. दरम्यान, या सेलिब्रेशनचा व्हिडिओ त्यांच्याच सोबतच्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि तो व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत शोधाशोध सुरू केली. अखेर डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी इरफानला अटक केली आहे.

याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे यांनी सांगितले की सोशल मीडियावर एक इसम रस्त्यावर ४-५ मित्रांना घेऊन स्वतःचा वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचा व्हिडिओ प्रसारीत झाला. गोपनीय कक्षाने माहिती घेतली असता त्या इसमाची ओळख पटली असून तो पत्रीपूल परिसरात या ठिकाणचा रहिवासी असल्याचे समजले. त्याचे नाव इरफानजामदार वय वर्षे २० असून गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)