
हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी मानाचा मुजरा, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, विधिमंडळातील सर्व सहकारी मंत्री, सहकारी आमदार, मान्यवर सर्वांना आपल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना, मराठी माणसांना न्याय देण्यासाठी, मराठी माणसाला न्याय. मागचे वर्ष ऐतिहासिक वर्ष राहिले आहे. आपण सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे उत्साह, प्रतिसाद, स्वागत, जल्लोष पाहायला मिळाला. आम्ही आरोपाला उत्तर कामाने देणार, हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे.
कितीतरी नेत्यांच्या घामातून शिवसेना मोठी झाली. याच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. फाटक्या लोकांना बरोबर घेऊन शिवसेना उभी केली. बाळासाहेबांची डरकाळी फोडल्यानंतर देश स्तब्ध व्हायचा. शिवसेना वाढवण्यासाठी कितीतरी लोकांनी जीव गमावले, हा एकनाथ शिंदे शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. या एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणूका लढवल्या आहेत. वयाच्या 21 व्या वर्षा कर्नाटकच्या बेळगावात 40 दिवस भोगलेत. शिवसेना मोठी झाली, लोकसभेची निवडणूक होती, डाॅक्टरचा फोन आला, आई आजारी होती, सभा पूर्ण करून आम्ही चूक केली. बाळासाहेबांच्या शुभेच्छा, धर्मवीर दिघे साहेबांची शिकवण असल्यामुळे आम्ही येथपर्यंत पोहचलो.
महाराष्ट्र हाच माझा परिवार आहे. मला थोडे जास्त वेळ काम करावे लागते, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे न्यायचे धाडस केले आहे, वाघाची डरकाळी होईपर्यंत तुमची कोल्हेकुई चालू असते, एकदा डरकाळी मी मुख्यमंत्री या नात्याने सांगतो, मी कालही कार्यकर्ता होतो, उद्याही कार्यकर्ता असणार आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. गद्दारी तुम्ही केली, तुमच्या पोटातील ओठात निघाले, तुम्हाला सिम्पथी मिळणार नाही.
ज्यांनी या मतदारांशी द्रोह केला. ते खरे गद्दार, बाळासाहेबांनी नेहमी काॅंग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले. शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले. मुख्यमंत्री कोण होते आणि सरकार कोण चालवत होते. मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि सरकार चालवते काॅंग्रेस, राष्ट्रवादी हे असेच चालू राहिले असते, तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेसुद्धा राहिलो नसतो. म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह दिले.
शेतकऱ्याच्या मुलाने हैलिकोप्टरने फिरले तर गैर काय
मुख्यमंत्री हेलिकोप्टरने जातो आणि शेतकरी म्हणून शेती करतो. शेतकऱ्याच्या मुलाने हैलिकोप्टरने फिरतो. हा मुख्यमंत्री रस्त्यात सही करतो, गाडीत बसताना सही करतो, शेतात बसलो तरी करतो, या पठ्ठ्याने 11 महिन्यात 75 कोटी वाटले. एक अपंग मुलाला मी 5 लाखाचा चेक देऊन टाकला, एका मुस्लीम बाईच्या मुलीला वाचवण्याचे काम केले. हे गतिमान सरकार आहे, बघतो, करतो, हे आता चालणार नाही. सर्वसामान्यांची रिक्षा तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही रिक्षावाल्याला नावे ठेवता, याच रिक्षाने तुमची मर्सिडीज खड्ड्यात घातली. बाळासाहेबांचे विचार आपण पुसून टाकयाचे प्रयत्न करताय, हीच शिवसेना बाळासाहेबांना विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली
बाळासाहेबांनी घामातून, कष्टातून, त्यागातून, बलिदानाने निर्माण केलेली शिवसेना तुम्ही पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली. तुम्ही कार्यकर्त्यामध्ये जिल्ह्या-जिल्ह्यात प्रतिस्पर्धी उभे करीत होता. मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, त्यांना भरसभेत शिवतीर्थवरून परत जाण्याला भाग पाडले. मी त्यांना सांगायचो, कार्यकर्ते मोठे करा, त्याशिवाय पक्ष मोठा होत नाही. जो ज्याचा गुण आहे, त्यांना मोठे करायला पाहिजे. बाळासाहेब म्हणाले मला एक दिवस देशाचा पंतप्रधान करा, राममंदिर बांधण्यासाठी, 370 कलम हटवण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेलेल्या सर्व मराठी माणसाला मुंबईत माघारी आणणार. गिरणी कामगारांना आम्ही साडेचार हजार चाव्या वाटल्या. गिरणी कामगारांनी शिवसेना मोठी केली. त्या गिरणी कामगारांना आम्ही चाव्या वाटल्या, सर्व गिरणी कामगारांना घरे देणार.
