
मुंबई : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छाबड हाऊसची गुगल इमेज, राजस्थानमध्ये हल्ल्याची योजना आखण्यासाठी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. दोन संशयित दहशतवाद्यांकडे मुंबईतील कुलाबा येते असणाऱ्या छाबड हाऊसची गुगल इमेजेस आढळल्याने मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील छाबडा हाऊस परिसराचीसुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छाबड हाऊसची गुगल इमेज, राजस्थानमध्ये हल्ल्याची योजना आखण्यासाठी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथील छाबड हाऊसचे काही गुगल फोटो संशयित आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहेत. यानंतर छाबडा हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. छाबडा हाऊसमध्ये आधीच अतिशय उच्च सुरक्षा आहे. या भागात एक मॉक ड्रिल देखील घेण्यात आली, अशी माहिती कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र एटीएसनं, मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर लागलीच या केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील रहिवासी आहेत. ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत.
