देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का, असा प्रश्न जनतेला पडला आहे; जितेंद्र आव्हाड

0

ठाणे : अनेकांनी बलिदान दिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालंय. मात्र, देशात आणि महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, ती पाहाता खरंच स्वतंत्र उरलं आहे का? असा प्रश्न जनतेला आज स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन साजरा करताना पडला आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.

'मणिपूर अक्षरश: पेटवलं गेलं, त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला, मात्र तिथलं सरकार आणि केंद्र सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही अशाच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात द्वेषाचं राजकारण इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की माणुसकी उरणार की नाही असा प्रश्न पडला आहे. लोकशाहीवर सध्या सर्वात मोठा हल्ला होतोय. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला आपली लोकशाही टिकवावी लागेल, असं आवाहन आव्हाड यांनी केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)