आज 5 दिवसांच्या गणपतींचे होणार विसर्जन; मुंबईतील समुद्रकिनारी कडकोट बंदोबस्त

0

मुंबई : बाप्पाची गणेशभक्त वर्षभर वाट पाहत असतात. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने वातावरणात भक्तीमय तसेच प्रसन्नता असते. दरम्यान, आपला लाडका बाप्पा गणपतीचे आगमन होऊन पाच दिवस होऊन गेले आहेत. त्यामुळं आज कित्येक घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील अनेक गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबईत जास्तीत जास्त घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळं या विसर्जन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, वरळी, शिवाजी पार्क, माहिम, जुहू आदी समुद्रकिनारी व्यवस्थितपणे गणपतीचे विसर्जन व्हावे यासाठी पालिका प्रशासन व मुंबई पोलीस यांनी खबरदारी घेतली आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

दुसरीकडे आज राज्यासह मुंबईत लाखो घरगुती गणपतींचे विसर्जण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा, डिजेची मर्यादा, तळीराम आदीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना, गणेशभक्तांनी काळजी घ्यावी समुद्राच्या आत, पाण्याच्या अधिक आतमध्ये जाऊ नये, असं आवाहन पालिका प्रशासन व पोलिसांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)