कल्याण डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतीकडे पालिकेचे दुर्लक्ष? गरिकांचे जीव धोक्यात

0

 


अनधिकृत तसेच निकृष्ट दर्जाच्या इमारतींसाठी कुप्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अखेर अतिधोकादायक इमारतींवर कारवाई कधी करणार हा प्रश्न डोंबिवलीतील सुजाण नागरिक विचारात आहेत. डोंबिवली पूर्वेतील सदानंद इमारत सुप्रसिद्ध साईपुजा बार इमारत अतिशय धोकादायक आहे. ह्या इमारतीमध्ये दररोज लोकांची वर्दळ असते. इमारत कधीही कोसळू शकते अशी ह्या इमारतीची अवस्था आहे. पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 




पावसाळ्याची चाहूल लागताच पालिका क्षेत्रातील मरणासन्न उभ्या असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. २०१५ साली ठाकुर्लीतील धोकादायक मातृछाया इमारत कोसळून ९ जणांचा बळी गेला होता. अश्या बऱ्याच घटना डोंबिवलीतील ग प्रभाग क्षेत्र घडलेल्या आहेत. ताजी घटना म्हणजे सप्टेंबर २०२३ रोजी आयारे रोडवरील ३ मजली इमारत कोसळली होती त्यात सुद्धा जीवित हनी झाली होती अश्या घटनेनंतर प्रशासन पावसाळ्याआधी दोन महिने जागे होऊन खबरदारीच्या उपाययोजनेच्या मागे लागते. मात्र ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवण्यातच अधिकारी धन्यता मानतात. पावसाळ्याव्यतिरिक्त आठ महिने प्रशासन काहीही हालचाल करत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने धोकादायक इमारती तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले असले, तरी रहिवाशांनी पुनर्वसन झाल्याखेरीज इमारती रिकामी करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

सदानंद इमारतीचे २०१८ साली धोकादायक घोषित करून २ माळे पालिकेकडून पाडण्यात आले होते. त्या नंतर पालिकेने पुन्हा ह्या ठिकाणी फिरकुन बघीले नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. इमारत कोसळली की तोपर्यंत सुस्त असलेली स्थानिक प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी होते व कामाला लागते. जसे काही अशी घटना घडल्यानंतरच त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. ह्या इमारतीवर ग प्रभाग क्षेत्र अधिक करवाई करतील का अशी चर्चा स्थानीक नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)