मुंबईतील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला, ३ जण जखमी

0

मुंबईच्या फोर्ट परिसरात शुक्रवारी दुपारी इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. एका जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. इतर दोन जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. नागरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाजवळील एमजी रोडवर असलेल्या जमिनीच्या टेरेस आणि वरच्या दोन मजल्यांच्या भाग शुक्रवारी दुपारी १२.५२ वाजताच्या सुमारास कोसळला. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक बीएमसी वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची तात्पुरती नाकाबंदी करण्यात आली आणि जखमींना बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आले.

संजय सिंह (वय, ४८) असे जखमी झालेल्या एका व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. तर, दोन जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)