माणिकराव कोकाटेंच्या खात्याची जबाबदारी आता कोणाकडे? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

0

माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत महत्वाचं भाष्य केलं आहे. कोकाटे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांच्या जागी मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? यावर अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

माणिकराव कोकाटेंच्या खात्याची जबाबदारी आता कोणाकडे दिली जाणार? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्याची जबाबदारी सध्या अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे".   

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)