डोंबिवली : स्व. देवचंद कांबळे फाऊंडेशन व श्री डोंबिवली लोहाणा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच चिदानंद ब्लड बँक यांच्या सहकार्याने दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी श्री डोंबिवली लोहाणा समाज हॉल, शिवमंदिर रोड, सुखसागर डेअरीच्या शेजारी, डोंबिवली (पूर्व) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजोपयोगी आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरला.
या रक्तदान शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. वाढती लोकसंख्या, अपघात, शस्त्रक्रिया तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज लक्षात घेता असे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
शिबिरादरम्यान चिदानंद ब्लड बँकेच्या तज्ञ वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने रक्तसंकलन केले. रक्तदात्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतल्यामुळे अनेक युवक-युवती व ज्येष्ठ नागरिकांनी देखील आत्मविश्वासाने सहभाग नोंदवला.
या उपक्रमास श्री डोंबिवली लोहाणा समाज व स्व. देवचंद कांबळे फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सदानंद थरवळ (भाई) – संस्थापक व अध्यक्ष, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन यांच्यासह विशाल शेटे, प्रणव केणे, संतोष केणे, राहुल भगत, अक्षरा पटेल, कुणाल ढापरे, अजय घरत, संजय मांजरेकर, कुशाल गडा, कोमल पाटील, गीता केणे, अनिल ठक्कर, अल्पा चव्हाण, ॲड. नागेश कांबळे, ॲड. पूजा भालेराव, ॲड. सुप्रिया नाईक, ॲड. अक्षय खडसेकर, ॲड. उदय सोनवणे, ॲड. सुनीता देवरे, निखिल भोईर, अखिल भोईर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. श्री डोंबिवली लोहाणा समाजाचे अध्यक्ष प्रमोद पुंजाणी, सचिव ॲड. चेतन ठक्कर, PRO नितीन कटारिया व रसिकभाई तसेच स्व. देवचंद कांबळे फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष ॲड. रेखा कांबळे, सचिव आनंद पर्वते, खजिनदार अभिजित नलावडे, सहखजिनदार प्रशांत जाधव, तसेच ॲड. अरुण सावंत, सिद्धांत कांबळे, संतोष पांडे, यतिन करंदीकर, जेनी राणावत, दमयंती भानुशाली, दीपा पाटील, वैशाली पवार, सचिन सुर्वे, डॉ. श्रद्धा सुर्वे, कु. करण सुर्वे यांनी संयोजनात मोलाचे योगदान दिले.
शहरातील अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट देत रक्तदाते व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, कार्यकर्ते, पदाधिकारी व सहकारी संस्थांचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
शहरातील अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट देत रक्तदाते व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, कार्यकर्ते, पदाधिकारी व सहकारी संस्थांचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
