
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज अग्रहरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी डोंबिवलीतील एका किराणा दुकानात काम करतो. तर, त्याची पत्नी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत नोकरीला आहे. मनोजला दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो दररोज त्याच्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. आरोपीला चार मुली आहेत. त्याची धाकटी मुलगी तिच्या आजी-आजोबांसोबत त्यांच्या मूळ गावी राहते.
आरोपी रविवारी त्याची १४ वर्षांची मुलगी काम करत असलेल्या भंगाराच्या दुकानात गेला. तसेच तिला तिच्या मतिमंद बहिणीच्या मृत्युची माहिती दिली. हे ऐकल्यानंतर आरोपीच्या मुलीने धावत घर गाठले. त्यावेळी तिची बहिणी बेडवर मृतावस्थेत पडलेली दिसली. तिने ताबडतोब याबाबत तिच्या आईला कळवले. याप्रकरणी आरोपी मनोजविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
