सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा मार्कशीट!

0

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीटीईटी २०२३ निकाल पाहण्यासाठी उमेदवार सीटीईटी २०२३ च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर भेट देऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच सीटीईटी २०२३ परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध झाली होती.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २० ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आली होती. यानंतर या महिन्याच्या सुरुवातील सीटीईटी २०२३ परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. या परिक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतिक्षा अखेर संपली. सीटीईटीचा निकालादरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले की, सामन्य गटातील उमेदवारांसाठी कट ऑफ ६० टक्के म्हणजेच ९० गुण असेल. तर, एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी ५५ टक्के म्हणजे ८२.५ गुण आहेत.

या परीक्षेसाठी २९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. दरम्यान, १५ लाख १ हजार ७१९ उमेदवारांनी पेपर १ साठी नोंदणी केली होती. तर, १४ लाख २ हजार १८४ उमेदवारांनी पेपर २ साठी फॉर्म भरला होता. या परीक्षेला ८० टक्के उमेदवारांची उपस्थिती होती. महत्त्वाचे म्हणजे, पेपर १ उतीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास पात्र असतील. तर, पेपर २ मध्ये यश मिळवलेले उमेदवार इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास पात्र असतील.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)