गोपाळ सरघड (वय २०) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर दीपक भोरकडे असं प्रकृती चिंताजनक असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला दिग्रसमधल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मानोरा शहरातील जुन्या वस्तीत असलेल्या जय भोले दुर्गा देवी मंदिरात साफ सफाईचे काम सुरू आहे. यावेळी मंदिराच्या कळसाची स्वच्छता करण्यासाठी लोखंडी शिडी घेऊन जाताना शिडीचा विद्युत तारांना स्पर्श झाला, त्यामुळे न जणांचा शॉक लागला व त्यात गोपाळला जीव गमवावा लागला आहे.
७ जणांवर मानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रकृती चिंताजनक असलेल्या तरुणाला दिग्रसला हलवण्यात आले आहे. गौरव पद्मगिरवार, राम पांडे, शाम पांडे, शीवम पद्मगीरवार, तन्मय सवंदळे, सचिन सुरजूसे आणि देवेंद्र सवंदळे अशी जखमी तरुणांची नावे आहे. या घटनेमुळे मानोरा शहरात हळहळ व्यक्त होत असुन मानोरा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

