
नांदेड : नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारी १२ मुलांसह २४ रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतांना आज आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार नवजात बालकांचा समावेश असून गेल्या ४८ तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. असे असून देखील रुग्णालय प्रशासन धिम्म असून औषधांच्या कमतरतेमुळे हे झाल्याचे विद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी नाकारले आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी देखील या प्रकरणी ट्विट केले आहे.
नांदेडचे शासकीय रुग्णालय मराठवाड्यातील मोठे रुगाणालय आहे. या रुगालयात रविवारी रात्री १२ पासून ते सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात नवजात बालकांसोबत सर्प दंश, विष प्राशन आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या १२ रुग्णांचा समावेश होता. एकाच दिवसांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. या सोबतच राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. ही बाब ताजी असतांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी देखील ४ नवजात बालकांसह ७ रुग्णांचा पुन्हा मृत्यू झाला आहे. यामुळे रविवार पासून मृत्यूमुखी पडलेल्यांकही संख्या ही ३१ झाली आहे. यात १६ नवजात बालकांचा समावेश आहे.
याबाबत अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत सरकारवर ताशेरे ओढले आहे. चव्हाण ट्विट करत म्हणाले की, या रुगालयात मृत्यूचे थैमान सुरूच आहे. कालपासून या रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात ४ नवजात बालकांचा समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी,"
तर एका वृत्तवाहिणीशी बोलतांना चव्हाण म्हणाले " मी काल रुग्णालयात जाऊन आलो आहे. या रुग्णालयातील परिस्थिती गंभीर आहे. काही तासात आणखी ७ लोकांचा मृत्यू झल्याने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झाले आहे.
