मतदानासाठी 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

0

महाराष्ट्रात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पुढील आठवड्यात गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, मंडळं इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.

या महापालिका क्षेत्रामध्ये सुट्टी जाहीर
अ.क्र.विभागजिल्हामहानगरपालिकेचे नाव
कोकण विभागमुंबई शहर/मुंबई उपनगरबृहन्मुंबई महानगरपालिका
ठाणेठाणे
नवी मुंबई
उल्हासनगर
कल्याण-डोंबिवली
भिवंडी-निजामपूर
मिरा-भाईंदर
पालघरवसई-विरार
रायगडपनवेल
१०नाशिक विभागनाशिकनाशिक
११मालेगाव
१२अहिल्यानगरअहिल्यानगर
१३जळगावजळगाव
१४धुळेधुळे
१५पुणे विभागपुणेपुणे
१६पिंपरी-चिंचवड
१७सोलापूरसोलापूर
१८कोल्हापूरकोल्हापूर
१९इचलकरंजी
२०सांगलीसांगली-मिरज-कुपवाड
२१छत्रपती संभाजीनगर विभागछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर
२२नांदेडनांदेड-वाघाळा
२३परभणीपरभणी
२४जालनाजालना
२५लातूरलातूर
२६अमरावती विभागअमरावतीअमरावती
२७अकोलाअकोला
२८नागपूर विभागनागपूरनागपूर
२९चंद्रपूरचंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)